कोल्हापूर / गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।
लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणातून मैत्रिणीचा खून केलेल्या तरुणाने आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे- कातळेवाडी येथे आज (दि.५) आढळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे.
दरम्यान, प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय 23, रा. जय भवानी गल्ली, कसबा बावडा) हिचा खून केलेला प्रियकर सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री ता. पन्हाळा) हा घटनेनंतर पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शिवाजी पेठ व पेंद्रेवाडीतील घरावर छापे टाकले; पण तो मिळाला नाही. दरम्यान, पोलिसांनी यादव याने गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला.
लिव्ह इनमध्ये राहून लग्नाला नकार देत असल्याच्या रागातून यादव याने मंगळवारी (दि. ३) दुपारी प्रेयसी समीक्षा हिचा चाकूने भोसकून खून केला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी चार पथके तैनात केली होती. त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना लोकेशनही सापडत नव्हते. मृत समीक्षाचे खुनावेळी रक्ताने माखलेले कपडे, यादवने गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. समीक्षाची मैत्रीण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आयशू अंपले, समीक्षाची आई, बहिणीचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.



0 Comments