खिद्रापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
खिद्रापूर येथील प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर दर्शनासाठी आणलेल्या विद्यार्थ्यांना गाडीत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने अनेक लहान विद्यार्थी रडू लागल्याने नागरिकां कडून शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सदर शाळेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यात कोपेश्वर दर्शनासाठी विद्यार्थी सहली खिद्रापूर ता. शिरोळ येथे येत आहेत. मात्र जवळच असलेल्या सैनिक टाकळी येथील एका इंग्रजी माध्यमातील शाळेतून विद्यार्थी दर्शनासाठी आले होते. मात्र सात ते आठ प्रमाण असणाऱ्या गाडीमध्ये चाळीस विद्यार्थी कोंबून आणण्यात आले होते. शाळेतून निघाल्यापासून हे विद्यार्थी रडत होते. त्यांना मेंढराप्रमाणे गाडीत कोंबून उभे करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना श्वासही घेता येत नव्हता अनेक विद्यार्थी गुदमरून गेले होते.
तर पार्किंग येथे गाड्यातील विद्यार्थी उतरताना दोन गाडीतील चालकांमध्ये माझ्या गाडीत चाळीस विद्यार्थी आहेत तुझ्या गाडीत किती? असा प्रश्न विचारतात. पन्नास विद्यार्थी आहेत असा दुसरा उत्तर देत होता. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात आल्याची घटना घडल्याने एखादा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. चिमुकल्यांच्या जीवाशी सदर शाळेने खेळ मांडल्याचे उघड उघड दिसून येत होते. त्यामुळे शालेय व्यवस्थापनाबद्दल नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून सदर शाळेची चौकशी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.



2 Comments
बातमी चुकीची आहे . पाऊस असल्याने मुलांना थोड्या वेळा साठी गाडीत बसवले होते .
ReplyDeleteबातमी चुकीची आहे म्हणणाऱ्या महोदयांनी आपले नाव व नंबर द्यावे. अन्यथा व्हिडीओ व्हायरल झाला तर बातमी चुकीची म्हणणारे स्वत: व्हिडीओ पाहून शरमेने मान खाली घालतील
Delete