२५ वर्षांपासून रस्ता दुर्लक्षित; शालेय विद्यार्थ्यांसह पर्यटकांची गैरसोय रस्त्यासाठी आता दि. १२ डिसेंबर रोजी 'राजापूर बंद' चा निर्णय
खड्डेमय रस्त्यांमुळे येथील शालेय विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचा आणि वेळेचा अपव्यय होत आहे.
खिद्रापूर येथील जागतिक दर्जाचे कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या खराब रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंदिराच्या पर्यटनावरही विपरीत परिणाम होत आहे.
शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, गावकऱ्यांना दैनंदिन गरजांसाठीही त्रास सोसावा लागत आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाला निवेदनाद्वारे आपल्या व्यथा मांडून आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे ग्रामस्थांच्या भावनेची थट्टाच प्रशासनाने केली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे हताश झालेल्या राजापूर ग्रामस्थांनी आता कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी दि.१२/१२/२०२५रोजी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा (राजापूर बंद) निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
या आंदोलनासंबंधीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर व संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे.हे निवेदन मोहन ढवळे,धुळाप्पा दिवटे, संजय पाटील, चंद्रकांत गडगे, जावेद जमादार, आमगोंडा पाटील, नवाज खोंदू, सुरेश कांबळे, आदिनी ग्रामपंचायत राजापूर व ग्रामस्थ यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरू होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.



0 Comments