तत्कालीन मा.जिल्हाधिकारीसो दौलत देसाई यांनी खिद्रापूर येथील लाभार्थ्यांना कशा प्रकारची घरे देणार ते सांगितले होते. ते पहा 👇👇👇
खिद्रापूर /गीता संघर्ष वृत्तसेवा
या पद्धतीची घरे सर्वच लाभार्थ्यांना बांधून मिळणार होती . खिद्रापूर येथील अभिनेता सलमान खान यांनी दत्तक घेतलेल्या व ऐलान फाउंडेशनने बांधकाम सुरू केलेली घरे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. लाभार्थ्यांच्या कडून घेतले गेलेले पैसे, घरकुलांचे स्ट्रक्चर नसणे. त्याचा आराखडाच गायब करणे. लाभार्थ्यांना केलेल्या करार पत्राच्या झेरॉक्स प्रती न देणे. स्वीकारल्या गेलेल्या रकमेच्या रिसीट न देणे.
रक्कम स्वीकारणारे, करार पत्र करणारे, अपूर्ण कामाबद्दल विचारणा केली असता- आम्हाला काही माहीत नाही, आमचा काही संबंध नाही, अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन लाभार्थ्यासोबत वाद निर्माण करणे. अशा अनेक गोष्टींनी सलमान खानची घरं आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. यासंबंधी भाष्य करताना यड्रावकरांचे समर्थक म्हणाले की , खाली मोकळं आणि वरती घर असा सलमान खानचा पॅटर्न आहे. तसेच काही यड्रावकर समर्थक लाभार्थ्याकडून इंजिनीयर आय. आय. पटेल यांनी सलमान खानचे वरून पैसे आले नाहीत ते आले की मी परत करतो या बोलीवर यड्रावकर समर्थक लाभार्थ्यांकडून पैसे घेतले आहेत. ते आरटीजीएस द्वारे स्वीकारले गेले आहेत. त्याची पोच स्वतःजवळ असल्याचे यड्रावकर समर्थक सांगतो.
यड्रावकर समर्थक लाभार्थ्यांना मात्र मोफत घरे बांधून दिली जातात .पण गरीब लाभार्थ्यांकडून 95 हजार 100 इतकी रक्कम घेतल्याखेरीज घरे बांधली जाणार नाहीत ,असे म्हणून गरीब लाभार्थ्यांना लाचारपणाची वागणूक येथील फाउंडेशन मार्फत काम पाहणारे कार्यकर्ते... तसेच इंजिनीयर हे देत आहेत .
त्यामुळे यड्रावकर समर्थकांना फुकटची घर आणि इतर लाभार्थी गावकऱ्यांना पैसे टाकल्याशिवाय घरे नाहीत, ही राबवली गेलेली पद्धत म्हणजे सामाजिक कार्यात राजकारणाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे.
खिद्रापूर गावात मात्र यड्रावकर समर्थकांना दिलेली सलमान खान पॅटर्नची घर आणि इतर लाभार्थ्यांना देण्यात आलेली घर. घरांचे स्ट्रक्चर एकसारखे नसणे, घरांचा आराखडा उपलब्ध न होणे, याबाबत खिद्रापूर गावात चर्चा होताना दिसून येत आहे.
काही लाभार्थ्यांना मोफत घरे बांधून देणे, काही लाभार्थ्यांच्या कडून पैसे घेतल्याचा देखावा करणे आणि पैसे घेतले तरी ते इतर लाभार्थ्यांनी तक्रार करू नये म्हणून तात्पुरते भरा नंतर परत करणार असल्याचे , काही लाभार्थ्याकडून पैसे घेतल्याशिवाय काम न करणे. घरकुल बांधकाम न करणे, असे प्रकार म्हणजे राजकीय दृष्टिकोन ठेवून लोकांना चिंबविणे , नाहक त्रास देणे. त्यामुळे सहाजिकच लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याने खिद्रापूर गावातील लाभार्थ्यांचा आक्रोश होताना दिसून येत आहे








0 Comments