Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

स्मार्ट मीटर विरोधात कुरुंदवाडमध्ये एल्गार

 कुरुंदवाड/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क। 

स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने महावितरणच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात आज बुधवार, दिनांक 4 जून

रोजी सुरू झालेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला यश प्राप्त झाले. महावितरणच्या विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री. विजयकुमार आडके यांनी आंदोलनस्थळी येऊन आठ दिवसात वरिष्ठ पातळीवर व शासन दरबारी स्मार्ट मीटरविषयी जनतेच्या भावना पोहोचवून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले.

लेखी आश्वासनात स्मार्ट मीटर सक्ती रद्द करणे, आधी बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवणे, स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिले दुरुस्त करणे, शेती पंपासाठी सौर पॅनल सक्ती कायमस्वरूपी रद्द करणे, शेतीपंपाची अश्वशक्तीची अट रद्द करून वीज बिल माफ करणे.

तसेच, जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटरच्या वीज बिलांची वसुली थांबवण्याचेही लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने जर योग्य निर्णय झाला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना व संघर्ष समितीचे अविनाश गुदले, किरण गावडे, विश्वास बालीघाटे, प्रभाकर बंडगर, वर्धमान भबिरे, योगेश जिवाजे, कार्तिक बलवान, तसेच कुरुंदवाडचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, माजी नगरसेवक उदय डांगे, दीपक पोमाजे, दीपक गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळ चव्हाण, बापूअण्णा मधाळे, अजित देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...