खिद्रापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा :
![]() |
| दुर्दैवी मयत - मंगल रायनाडे |
दिपावलीचा बाजार करून घरी परतणारी खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील महिला मजरेवाडी - अकिवाट रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठार झाली. मंगल दिलीप रायनाडे (वय ४९) या महिलेचे नाव आहे.
![]() |
| याच खड्याने घेतला जीव |
याबाबत अधिक माहिती अशी, खिद्रापूर येथील दिनेश रायनाडे हा आपली आई मंगल रायनाडे यांना घेऊन कुरुंदवाड येथे शनिवारी (ता. ४) दीपावलीचा बाजार करून खिद्रापूरला आपल्या गावी परतत होता. रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने आईसह तो रस्त्यावर खाली पडला. या अपघातात मंगल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला. मिरज शहर पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे. कुरुंदवाड पोलिस ठाण्याकडे या अपघाताचा तपास वर्ग करण्यात आला आहे.




0 Comments