बदलापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये नेत असताना त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून स्वतःवर गोळी झाडल्याचे समजते. अक्षय शिंदे याची प्रकृती गंभीर आहे.
आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून बदलापूरला नेत असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने त्या बंदुकीतून तीन राऊंड फायर केले. या गोळीबारात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला तर एका पोलीस देखील जखमी झाला आहे. निलेश मोरे असे त्या पोलिसाचे नाव असून या दोघांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



0 Comments