Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

वक्फ बोर्डाची मालमत्ता वाचवण्यासाठी शब्बीर अन्सारी यांनी केले हे आवाहन

खिद्रापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।

वक्फ बोर्डाची मालमत्ता वाचवण्यासाठी पुणे येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे हाजी शब्बीर अन्सारी यांचे आवाहन

केंद्र शासनाचे वक्फ बोर्ड संशोधन विधायक रद्द संदर्भात २८ सप्टेंबरला पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय सभेला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तहेरिक ए औकाफ चे अध्यक्ष  शब्बीर अहमद अन्सारी यांनी केले.

खिद्रापूर ता. शिरोळ या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेल्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या बैठकीत ते बोलले होते. या बैठकीमध्ये त्यांनी वक्फ बोर्ड बिल २०२४ बाबत सूचना केल्या व वक्फची मालमत्ता वाचवण्यासाठी राज्यस्तरीय चळवळ सुरू असून व बोर्डाची राज्यातील जमीन वाचवण्यासाठी तहरिक ए औकाफ चळवळीच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाचे वक्फ बोर्ड विधायक रद्द करण्यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी येत्या २८ तारखेला राज्यस्तरी बैठक बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितीना दिली यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...