Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्या प्रकरणी लहान भावासह त्याच्या साथीदाराला अटक

कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।

  हुपरी येथे वाळवेकरनगर  परिसरातील ब्रम्हंनाथ सुकुमार हालुंडे (वय 31 .सध्या रा. सिल्व्हर झोन C'13 ,फाइव्ह स्टार एमआयडीसी) याचा रविवार दि.22/09/2024 रोजी दुपारच्या  सुमारास धारदार शस्त्रांने त्याच्या पोटावर , छातीवर, हातावर आणि  मानेवर वार करून खून केल्या प्रकरणी प्रविण सुकुमार हालुंडे (वय 28.रा.मानेनगर रेंदाळ) आणि त्याचा साथीदार आनंद शिवाजी खेमलापुरे (वय 22.रा.श्रीचौक, हुपरी ) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 12 तासात अटक करून त्यांच्या कडील चोरीतील चांदीचे दागिने आणि गुन्हयांत वापरलेली मोटारसायकल जप्त करून पुढ़ील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

अधिक माहिती अशी की,पंचताराकीत एमआयडीसी येथे सिल्व्हर झोन परिसरात रहात असलेला ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (31) याचा धारदार शस्त्रांने रविवार (दि.22) रोजी खून झाला होता.या खूनाची नोंद गोकुळशिरगाव पोलिस ठाण्यात झाली होती.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हें अन्वेषणच्या पथकाला आणि संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिसांना या गुन्हयांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुशंगाने तपास करीत असताना स्थानिक गुन्हें अन्वेषणच्या पोलिसांना प्रॉपर्टीच्या मालमत्तेवरुन भावा भावात वाद असल्याची माहिती मिळाली असता त्याचा लहान भाऊ प्रविण याला रहात्या घरातुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता माझा मोठा भाऊ ब्रम्हनाथ हा घरी कुणाचे ऐकत नसल्याने आणि वडिलोपार्जित व्यवसायातील चांदीचे दागिने स्वतः कडेच ठेऊन घेतले होते.ते वारंवार मागून ही देत नसल्याने व कामात अडथळा निर्माण झाल्याने याचा राग मनात धरुन मी आणि माझा मित्र रविवार दि.(22) रोजी ब्रम्हनाथ याच्या घरात जाऊन वाद घालत मी त्याला पकडून माझा साथीदार आनंद याने  त्याच्यावर धारदार शस्त्रांने त्याच्या पाठीवर, मानेवर, छातीवर आणि हातावर वार करून खून केल्याची कबुली दिली.तुझा दुसरा साथीदार कुठे आहे असे विचारले असता कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती दिली. पोलिसांनी रायबाग येथे जाऊन आंनंद खेलापुरे याला अटक करून खून केल्या प्रकरणी या दोघांना अटक करून 12 तासात खुनाचा छडा लागला.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...