Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

सैनिक टाकळी येथे मराठा आरक्षणप्रश्नी कॅन्डल मार्च

 टाकळी/गीता संघर्ष वृत्तसेवा। 

सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील सकल मराठा तरुणांनी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कँडल मार्च काढण्यात आला .यावेळी गावातील हजारो तरुण या मोर्चात सहभागी होऊन सरकार विरोधी जोरदार घोषणा करत होते.

मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली असताना त्यांच्या समर्थनार्थ गावागावांत उपोषण सुरू करण्यात आले आहे. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली फेरी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली . यामध्ये लहानापासून थोरापर्यंत तसेच महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.  यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे

यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...