कुरुंदवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा।
![]() |
| पाखरे - जी मार्फत पुरस्कार प्राप्त मान्यवर |
![]() |
| सपोनि. रविराज फडणीस (कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार) |
खिद्रापूर येथील पाखरे - जी ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सागर पवार यांनी पाखरे - जी च्या वतीने आयोजित पाखरे - जी राष्ट्रीय गुणिजन गौरव पुरस्कार सोहळ्या दरम्यान अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
![]() |
| अध्यक्षस्थानी मनोगत व्यक्त करताना सपोनि सागर पवार |
पाखरे - जी ट्रस्ट आणि गीता संघर्ष परिवार यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. पाखरे - जी चे पुरस्कार समाजाला प्रेरणा देतात, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि अभिनेते दगडू माने यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले.
![]() |
| अभिनेते तथा जेष्ठ पत्रकार श्री दगडू माने (कलारत्न पुरस्कार) |
यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनी रविराज फडणीस यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर अभिनेते दगडू माने यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
![]() |
| डॉ. रोहिणी शिंदे खोतवाडी ता. पन्हाळा ( सर्वोत्कृष्ट सेवारत्न पुरस्कार) |
खोतवाडी तालुका पन्हाळा येथील डॉ. रोहिणी विक्रमसिंह शिंदे यांना सर्वोत्कृष्ट सेवारत्न, कांचनवाडी तालुका करवीर येथील डॉ. गणेश यादव यांना आरोग्य सेवाभूषण, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील चंदुर येथील सरपंच सौ. पूजा कांबळे यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार
![]() |
| सौ. पूजा कांबळे मा. सरपंच ग्रा.प.चंदूर ता. चिक्कोडी ( आदर्श सरपंच पुरस्कार ) |
तर सैनिक टाकळी येथील निवेदिता वासमकर यांना महिलारत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
![]() |
| डॉ. गणेश यादव कांचनवाडी ता. करवीर ( आरोग्य सेवाभूषण पुरस्कार ) |
पाखरे- जी च्या वतीने एकूण 30 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यापैकी 24 पुरस्कार हे ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले.
![]() |
| सौ. निवेदिता वासमकर टाकळी ता. शिरोळ (महिलारत्न पुरस्कार) |
यावेळी खिद्रापूरच्या माजी सरपंच तथा ट्रस्टच्या संचालिका गीता पाखरे, अकिवाट गावचे विद्यमान सदस्य अमोल माने, आप्पासाहेब म्हैशाळे व जे डी न्यूज च्या संपादिका मंदा कानडे-देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पाखरे यांनी केले, तर आभार ट्रस्टच्या संचालिका गीता पाखरे यांनी मानले.










0 Comments