कुरुंदवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा।
आलास (ता. शिरोळ) येथून १० चाकी ट्रक चोरी केल्याप्रकरणी चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. राजाराम दऱ्याप्पा कांबळे (वय ३२, रा. इंदिरानगर सोन्याळ, ता. जत. सध्या रा. नविन वसाहत, इनामधामणी, ता. मिरज ) असे त्याचे नाव आहे. चोरीची फिर्याद ट्रक चालक नारायण गोविंदराव हिवाळे (वय ३६, रा. औरंगाबाद रोड, वृंदावन नगर, नांदुर नाका, माडसांगवी, नाशिक) याने कुरुंदवाड पोलीसात दिली होती.
आलास येथून शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक (एम. एच. १८ बी. जी. ५१४६ ) चोरीस गेला होता. सपोनि रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत गणेशवाडी गावच्या हद्दीत कातरकटटी ते कागवाड रस्त्यावर संशयित आरोपी राजाराम कांबळेसह ट्रक असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध स.पो.नि.रविराज फडणीस यांचे आदेशाने सागर पवार पोलीस उपनिरक्षक, डी.डी. सानप, बी.पी. कोळी, व्ही. एम. कराडे, एस.एस. फोंडे, आर.एस. सानप, पी.एस. ऐवळे, नागेश केरीपाळे, सागर खाडे , अमित पवार , सचिन पुजारी , होमगार्ड जाधव व माने ट्रक व आरोपीचा शोध घेतला.



0 Comments