Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

दत्तवाड येथे सकल मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण , मुंडन करून सरकारचा निषेध

 दत्तवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा। 

दत्तवाड ता. शिरोळ येथील मराठा समाजाचा बुलंद आवाज  मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाचे गांधी चौक  येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आले आहे. यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. एक मराठा लाख मराठा या घोषणेने चौक दुमदुमून गेला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ मराठा समाजाचा आरक्षण द्यावे अशी मागणी समस्त मराठा बांधव करत आहेत. 
या उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी  मराठा बांधवांकडून मुडंन करून शासनाचा निषेध करण्यात आला. तर गाव कामगार तलाठी मुजावर यांना निवेदन देण्यात आले.आपण वाचत आहात जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड.
    यावेळी गावातील विविध धार्मिक संघटना, पक्ष यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.यामध्ये 
दत्तवाड ग्रामपंचायत तलाठी मुजावर, मंडल अधिकारी कुंभार समस्त मुस्लिम समाज दत्तवाड यड्रावकर गट दत्तवाड  स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडी
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील  ,डी एन सिदनाळे, बबनराव चौगुले,सुरज शिंगे प्रकाश चौगुले,अभिनंदन पाटील सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच  मनीषा चौगुले सर्व ग्रामपंचायत सदस्य , सुकुमार सिदनाळे ,विवेक चौगुले, अजित चौगुले, प्रकाश मगदूम , नुर काले ,प्रमोद पाटील, नागेश पाटील, राजू पाटील, संजय पाटील,अशोक पाटील,उदय पाटील, मलगोंडा पाटील, विरुपाक्ष हेरवाडे,अमित माने,भैया चौगुले, राजगोंडा पाटील गुमठे,अचिन हेरवाडे, रफिक मुल्ला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, लाला मांजरेकर,बाशा मुल्ला, युवराज माने, भगतसिंग शिलेदार दानवाड यांनी पाठिंबा दिला.
      तर वैभव उगळे, दयानंद मालवेकर, आप्पसो भोसले,प्रतिक धनवडे यांनी भेट देवून पाठिंबा दिला.
      यावेळी तानाजी मोहिते, युवराज घोरपडे, बाबुराव पोवार, दिलीप साळुंखे, बाबुराव मोठे, सुनील पलस्कर, दत्ता पवार, नितीन खरपी, पापा घोरपडे, विजय घोरपडे, बाळ काटकर, सुरेश कंदले, अभिनंदन टोपाई त्याचबरोबर मराठा बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...