Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

सैनिक वेल्फेअर असोसिएशन कडून गावांमध्ये 350 वृक्ष लागवड.

 नामदेव निर्मळे यांजकडून

टाकळी/गीता संघर्ष वृत्तसेवा

टाकळीवाडी ता. शिरोळ येथील सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे  संस्थापक माजी  कॅप्टन रमेश निर्मळे व माजी सुभेदार विद्यमान महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष केंदबा कांबळे यांच्या संकल्पनेतून श्री सरस्वती हायस्कूल व मराठी शाळा, गाव तलाव, स्मशान भूमी, टाकळीवाडी घोसरवाड रस्ता,या ठिकाणी विविध 15 प्रकारचे वृक्ष एकुण 350 वृक्ष लागवड करण्यात आली.

   नियमित  सैनिक वेल्फेअर असोसिएशन गावामध्ये अनेक उपक्रम कार्यक्रम राबवत असतात.

   वृक्ष लागवडीचे महत्त्व ओळखून त्यांनी हा वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे.

   वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या प्रमाणे टाकळीवाडी गाव करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. फक्त नावापुरते झाड लावणे हे उद्देश नसून ते जगवण्याची सुद्धा या सैनिक असोसिएशन कडून हमी देण्यात आली आहे.

   यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम चिगरे,भरमु बदामे,भरत पाटील,भरत निर्मळे, नागरिक संजय पाटील ,संजय कुंभार, सैनिक असोसिएशनचे सदस्य गोपाल निर्मळे, लक्ष्मण निर्मळे, दादा खोत ,सुदर्शन शिरगुपे, तसेच आजी-माजी सैनिक, हायस्कूल चे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, शिक्षिका ,सर्व विद्यार्थी, समस्त गावकरी उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...