कोल्हापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी आँन कँमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपुर्ण चौकशी करण्याची व संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभ करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.



0 Comments