Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

एसटीच्या एसी बसमधून प्रवाशांना मिळणार सवलत

मुंबई/गीता संघर्ष वृत्तसेवा।  

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यातील ३५ टक्के बसगाड्या वातानुकूलित करण्याची प्रक्रिया एसटी महामंडळाने सुरू केली आहे. या ताफ्यातून रुग्णांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, यासाठी वाहतूक विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

एसटी महामंडळातून २९ सामाजिक घटकांना प्रवाससवलत देण्यात येते. यामध्ये ३३ टक्यांपासून ते १०० टक्के, अर्थात मोफत प्रवासाची तरतूद आहे. साध्या आणि निमआराम श्रेणीतील हिरकणीसह आरामदायी शिवशाही बसमध्ये ही सवलत मिळते.

सिकलसेल, एचआयव्ही, डायलेसिस आणि हिमोफेलिआ आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना केवळ साध्या श्रेणीतील बसमध्येच सवलत आहे.

एसटी महामंडळात विजेवर धावणाऱ्या पाच हजार ३०० वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. त्या प्रत्यक्षात धावू लागल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी या ई-बसमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून देण्यात येते. त्यामुळे हा प्रस्ताव सरकारने मंजूर केल्यानंतरच सवलत लागू होणार असल्याचे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले..

एसटी पुनरुज्जीवन आराखड्यानुसार, १२ मीटरच्या दोन हजार ८०० व नऊ मीटरच्या दोन हजार ३५० आणि इतर १५० ई-बस बांधणीसाठी एसटी महामंडळाने कंत्राटदार नियुक्त केले आहेत.  येत्या महिन्याभरात ताफ्यातील पहिली बस दाखल होणार आहे. तिची चाचणी यशस्वी झाल्यानंतर दोन वर्षांत संपूर्ण ताफा महामंडळात दाखल होणार आहे. 

दरम्यान सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...