टाकळीवाडी/गीता संघर्ष वृत्तसेवा (नामदेव निर्मळे यांजकडून)
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
विशेष म्हणजे मुलींना राखी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले जाते.व मुली स्वतः राखी जेवढे शाळेत मुले आहेत तेवढ्या राख्या तयार केल्या जातात व रक्षाबंधन दिवशी मुलांना राखी बांधली जाते.
स्वावलंबन कसे बनावे या रक्षाबंधनातून दिसून येते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी हजर होते.
तसेच सैनिक टाकळी येथील कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेत सैनिक मार्गदर्शन व हर घर तिरंगा प्रभात फेरी आणि रक्षाबंधनाचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी तीनही शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच तीनही शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य , ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य उपस्थितीत होते.






0 Comments