सांगली / गीता संघर्ष वृत्तसेवा
गुन्ह्याच्या तपासात मदतीसाठी २५ हजार रूपयाची लाच स्विकारताना अटक केलेल्या पोलिस कर्मचारी संभाजी मारुती करांडे (रा. कोसारी) याचा पसार साथीदार पोलिस नाईक गणेश ईश्वरा बागडी याला सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

जत पोलिस ठाण्यात तक्रारदार याच्या भावावर अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व अपघातातील दुचाकी सोडवण्यासाठी पोलिस कर्मचारी बागडी याने २५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

त्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पडताळणी केली. त्यामध्ये बागडी व करांडे याने अपघाताच्या गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी व दुचाकी सोडवण्यासाठी २५ हजार रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
अभ्यंकर १८ जुलै रोजी पथकाने सापळा रचला. पोलिस कर्मचारी करांडे याला तक्रारदाराकडून २५ हजार रूपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. तर बागडी हा पसार झाला होता. .
बागडी व करांडे यांच्याविरुध्द जत पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात आठवडाभर बागडी हा पसार होता. आज त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी विशेष न्यायालयासमोर हजर केले.
तेव्हा दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली








0 Comments