कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा
राज्यातआगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणूका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर ताकतीने लढवणार आहे.
या सर्व निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लागावे असा सूचना दिल्या असून कोल्हापूर जिल्ह्यात मनसेच्या वतीने संघटनात्मक बांधणी त्याचबरोबर नूतन
पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे नेते, प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
अभ्यंकर दोन दिवस कोल्हापूर आहेत. त्यांनी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सर्वांनी पक्ष बांधणीसाठी परिश्रम घेऊन सर्व निवडणुकीत मनसेचा
झेंडा
फडकवावा, असे आवाहन केले. बैठकीला संपर्कप्रमुख जयराज लांडगे, माजी आमदार परशुराम उपरकर,
दिलीप धोत्रे, योगेश खैरी, हेमंत सभूश, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार, पुंडलिक जाधव, नगरसेवक राजू दिंडोर्ले, गजानन जाधव, दौलत पाटील आदी उपस्थित होते.










0 Comments