जयसिंगपूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।
उदगाव (ता. शिरोळ) सून आणि तिच्या मित्राने काठीने केलेल्या बेदम मारहाणीत सत्तर वर्षीय सासू गंभीर जखमी झाली. वत्सल्ला खंडेराव भंडारे (रा. राममंदीरजवळ, उदगाव) असे जखमी सासूचे नाव आहे. वैशाली मदन भंडारे व सागर जाधव (रा. हरिपूर ता. मिरज) अशी संशयित आरोपींची नांवे आहेत.
२३ जुलै रोजी रात्री ९.३० ते १० वा. सुमारास फिर्यादी यांच्या घरामध्ये ही मारहाण झाली. काठीने मारहाण करुन दहशत निर्माण करणे या कलमाखालीही गुन्हा नोंद आहे.
सून वैशाली व तिचा पती मदन यांच्यामध्ये घरगुती करणावरुन वाद आहेत. सदरचे वाद हे सासूबाई वत्सल्ला हिच्यामुळेहोत असल्याचा व त्यांच्यामुळेच अडचण होत असल्याचा राग
मनामध्ये धरून वैशाली हिने सासूच्या डोकीच्या केसाना धरून धक्काबुक्की करत वाईट शिवीगाळ करत घराबाहेर पडलेली लाकडी काठी आणून बेदम मारहाण केली.
बेदम मारहाणीत दोन्ही हाताना जखम होवून त्यातून रक्तस्राव झाला आहे.
त्याचवेळी सागर जाधव याने फिर्यादी यांना उद्देशून जातीवरून भंडारे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली व जाताना आरोपीनी जिवे
मारण्याची धमकी दिली. भंडारे यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ भांडणामध्ये काढुन घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैजनै तपास करीत आहेत.










0 Comments