इचलकरंजी/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।
येथील समाजवादी प्रबोधनी येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि संविधान संवादक यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट 'विमुक्त दिना'निमित्त एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 'भटक्या विमुक्तांचे प्रश्न व उपाययोजना' या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले व्यंकोबा भोसले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच विमुक्त वर्गाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य मिळवून दिले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी आरिफ पाणारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर ललित बाबर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. प्रशांत आंबी, बाबासाहेब नदाफ, शैला कुरणे आणि सायली मोरे प्रतीक्षा बुचडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मिनाज जमादार, रवी जावळे, चंद्रकांत जावळे, अजित मिनेकर, संस्थेचे पदाधिकारी आनंदा कांबळे, अमोल कदम, अमोल पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विमुक्त वर्गातील अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |












0 Comments