आमदार संग्राम जगताप म्हणाले, “हिंदूंवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीने अत्याचार होतील, त्याच पद्धतीने हिंदू समाज इथून पुढे सडेतोड उत्तर देईल.” त्यांनी कनवाड येथील घटनेचा तीव्र निषेध करत, हा हल्ला म्हणजे हिंदू समाजावर केलेला अन्याय असल्याचे म्हटले.
ह.भ.प. संग्राम भंडारे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, “इस्लामी सत्ता निर्मितीसाठी विधर्मींकडून हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार होत आहेत. त्यामुळे, आपले रक्षण करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करावी.” अक्षय कोळी आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनाने या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मोर्चानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, कनवाड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी दिलीप माणगावे आणि श्री. माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता.



0 Comments