Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

पुराच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची खिद्रापूरला भेट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खिद्रापूर/गीता संघर्ष न्यूज ऑनलाईन डेस्क। 

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावाला प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी आज भेट दिली. त्यांनी गावातील पूरपूर्व स्थितीची पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.

प्रांताधिकारी शिंदे यांनी यावेळी तलाठी सूरज माने, ग्रामसेवक संजय पाटील आणि सरपंच सौ.सारिका कदम यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी त्यांनी ग्रामस्थांना विशेषतः जनावरे आणि लहान मुलाबाळांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या. "पूरस्थिती उद्भवण्यापूर्वीच नागरिकांनी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जावे," असे आवाहन त्यांनी केले. तसेच, पूर आल्यानंतर गावात कोणीही नागरिक राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली. ग्रामपंचायतीने याबाबत योग्य नियोजन करावे, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

यावेळी खिद्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य पंचाक्षरी कोष्टी, अमित कदम, राजेन्द्र सुंके, जयश्री लडगे, रोहिणी कांबळे, इर्शाद मुजावर यांच्यासह गीता पाखरे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, मंडळ अधिकारी नितीन कांबळे, विस्तार अधिकारी रवी कांबळे, दयानंद खानोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यामुळे प्रशासनाने पूरस्थिती गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले असून, खिद्रापूर ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...