या भेटीदरम्यान, नीता आवळे आणि अमोल कदम यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये सरपंच सारिका कदम आणि उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत संभाव्य पूरपरिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या, त्यावर करता येणारे उपाय आणि प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी, संविधान समुपदेशिका गीता पाखरे यांनी संस्थेच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आणि भेटीचे प्रास्ताविक केले. आंबेडकरी शेती विकास संशोधन संस्था ग्रामीण भागातील समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी नेहमीच प्रयत्नशील असते, याचाच एक भाग म्हणून ही भेट असल्याचे आवळे आणि कदम यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्याच्या दृष्टीने संस्थेने हा पाहणी दौरा केल्याचे सांगण्यात आले.



0 Comments