सांगली/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।
कर्नाटकातील अलमट्टी धरणाने केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा केला आहे. १५ जून रोजी हे धरण ५२ टक्क्यांपर्यंत भरले आहे, तर नियमानुसार जूनअखेरपर्यंत ते केवळ ४७ टक्के भरणे आवश्यक आहे.
या नियमबाह्य पाणीसाठ्यामुळे कृष्णा, पंचगंगा, आणि वारणा नदीकाठच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये पुराची भीती निर्माण झाली आहे. सध्या धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक होत असताना, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. आगामी काळात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याने, वाढत्या पाणीसाठ्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.



0 Comments