कोरोचीत खळबळजनक घटना घडली आहे. कोरोचीच्या पाण्याच्या टाकीजवळ एका ५२ वर्षीय व्यक्तीवर लैगिंक अत्याचाराचा प्रकार घडलाय. पीडित व्यक्ती आणि आरोपी हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून, पीडित व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पत्राच्या शेडमध्ये पीडित व्यक्ती एकटेच होते. हीच संधी साधत आरोपीनं पीडित व्यक्तीला मारहाण केली. नंतर त्यांच्यावर अमानवी लैगिंक अत्याचार केला.
खळबळजनक घटना घ़डल्यानंतर पीडित व्यक्तीनं सगळी माहिती परिसरातील नागरीकांना सांगितली. त्यानंतर परिसरातील नागरीकांनी आरोपीला बेदम चोप देत रोष व्यक्त केला. पीडित व्यक्तीला आरोपीकडून मारहाण आणि नागरीकांनी आरोपीला दिलेला चोप, यामुळे दोघांनाही दुखापत झाली. यानंतर तातडीनं दोघांनाही इचलकरंजी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास पीडित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना कोल्हापूरातील जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणानंतर सीपीआर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. याप्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
.jpeg)


0 Comments