या बाबतची माहिती अशी की, आज दी. ६ जानेवारी रोजी संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्यासह आवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांना या चौघांना आज दुपारी १२:३० वाजता प्रचंड पोलीस बंदोबस्तात सरकारी वाहनातून केज पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
न्यायालयात हजर केल्यानंतर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले या तिघांच्या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांची सुनावणी घेण्यात आली. या चारही आरोपींची प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी श्रीमती एस. व्ही. पावस्कर यांच्या समोर हजर करण्यात आले होते. पावसस्कर यांनी या तिघांना १८ जानेवारी पर्यंत १२ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. तर खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला दि. १० जानेवारी पर्यंत ४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.



0 Comments