Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षात सुमारे ३५०० साध्या बसेस दाखल

 मुंबई/गीता संघर्ष ऑनलाइन डेस्क 

या नवीन वर्षात साल २०२५पासून एसटी महामंडळात तब्बल ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल करण्यात येणार आहेत. या बसेसमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. कारण या बसेस लांबी आणि रुंदीला मोठ्या असणार आहेत.

एसटी महामंडळाच्या साध्या बसेसची संख्या सध्या कमी झाली आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार बसेस आहेत. कोरोना काळापूर्वी साल २०१८ मध्ये एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसेस होत्या.परंतू कोरोना काळातील आर्थिक संकट आणि इतर कारणांनी एसटी महामंडळात अनेक वर्षे नव्या बसेसची खरेदी झालेली नाही, त्यामुळे एसटीतील जुन्या बसेसचे आयुर्मान संपल्याने त्यांना ताफ्यातून काढून टाकले होते. त्यामुळे ग्रामीण भागात बसेसची कमतरता जाणवू लागली होती. प्रवाशांना अतिरिक्त बसेस मिळत नसल्याची अडचण पाहून एसटी महामंडळाने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच १३०० बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला.  अशा सुमारे साडे तीन हजार बसेस टप्प्या-टप्प्याने एसटी महामंडळात चालू वर्षी म्हणजे या 2025 या सालात दाखल होणार आहेत.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...