एम.बी.बी.एस.च्या द्वितीय वर्षाची वार्षिक परीक्षा दि. 2 डिसेंबर रोजी सुरू झाली आहे. राज्यातील 50 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात असून त्यासाठी 7 हजार 900 विद्यार्थी बसले आहेत. दि. 2 रोजी पहिल्या दिवशी फार्माकोलॉजी- 1 चा पेपर होता. हा पेपर झाल्यानंतर पेपर फुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा पेपर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पेपरची चौकशी सुरू करण्याच्या आदेशाची शाई वाळण्यापूर्वीच बुधवारी घेण्यात येणारा फार्माकोलॉजी-2 चा पेपरही फुटल्याचे निदर्शनास आले. फार्माकोलॉजी 2 चा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी फुटल्याचे समजल्यामुळे दुपारी दोन वाजता सुरू होणारी परीक्षा एक तास पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे दोन ऐवजी तीन वाजता हा पेपर सुरू झाला. दरम्यान, फार्माकोलॉजी एकचा फुटलेला पेपर 19 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. एमबीबीएस द्वितीय वर्षाचा सलग दुसरा पेपर फुटल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात तो चर्चेचा विषय बनला आहे.
.jpeg)


0 Comments