Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

अवघ्या काही तासात घरफोडी प्रकरण उघड

कुरुंदवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा। 

कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीत अब्दुललाट येथे राहत्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी जलद तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. दि. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान, फिर्यादी पुरुषोत्तम गणेश कुलकर्णी यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून लोखंडी तिजोरीतील सोन्याच्या चार बांगड्या (२-३ तोळे) असा १,५०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे ओंकार परीट (वय २१) आणि योगेश कांबळे (वय २२) यांना ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या जवळून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...