Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

शिरढोणच्या लक्ष्मीत लाखोंचा अपहार : 13 जणांवर गुन्हा दाखल

कुरुंदवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा। 


शिरढोण ता. शिरोळ येथील श्री. लक्ष्मी विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स) सेवा संस्थेत 37 लाख, 89 हजाराचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघडकीस आले आहे. या संशयित अपहार प्रकरणी सचिव, चेअरमन, व्हाइस चेअरमनसह संचालक अशा 13 जणांच्यावर विरुद्ध लेखापरीक्षक सागर सदाशिव सुतार. (रा. तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे. या संशयित अपहार प्रकरणी संशयित आरोपी मयत अनिल भाऊसो पोवार (रा. टाकवडे ता. शिरोळ), सुहेल दस्तगीर बाणदार, धोंडीराम गणपती नागणे, सतीश बाळू आडगाणे महावीर सिध्दाप्पा नारगुडे, अरुण आप्पासो ऐनापुरे, एकनाथ भाऊ कांबळे, भाऊसो पांडुरंग चौधरी, देवगोंडा लखगोंडा पाटील, विकास आनंदा तनपुरे, आनंदा बाळासो चौगुले, समीर मुबारक मुजावर, वर्षा मनोज गुरवाण (सर्व रा.शिरढोण ता.शिरोळ) यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील लक्ष्मी संस्थेच्या 2023- 2024 या सालातील लेखापरीक्षण अहवालात सन 2020 ते 21 आणि 2023-24 या कालावधीत संशयित आरोपी संस्थेचा सचिव मयत अनिल पोवार याने सभासद कर्जदारांनी कर्जाची भरणा केलेली रक्कम भरणा न करता संस्थेमध्ये शिल्लक असलेली 27 लाख 2 हजार रुपये रकमेचा स्वतःच्या फायदया करीता अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. तर जमीन खरेदी पोटी मंजुरीविना 10 लाख रुपये आदा केली आहे. संस्थेत अनामत जमा नसताना 87 हजार रुपये अनामत रक्कम ही आदा केल्याचे दाखवले आहे. असा एकूण 37 लाख 89 हजाराचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले असून चेअरमन, व्हाइस चेअरमन आणि संचालक सामुदायीकरीत्या एकत्रीत व व्यक्तीशा त्रुटीची भरपाई करण्यास जबाबदार राहतील अशी तरतूद असताना त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नसल्याने त्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करावे अशी फिर्याद लेखापरीक्षक सुतार यांनी दिल्याने फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...