कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।
महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज कोल्हापूर तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, विधी सेवा केंद्र व राजवाडा पोलीस येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि “Just rights for Children” अंतर्गत बाल विवाह होऊ नये यासाठी शपथ विधी घेतला. या कार्यक्रमामध्ये शाळेतील एकूण ३०० विध्यार्थी उपस्थित होते तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे बालसंरक्षण अधिकारी वाईंगडे साहेब, दाते साहेब तसेच DLSA मधून इंगळे साहेब, अभिजित खोत साहेब व राजवाडा पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या संचालिका प्रभा यादव व कोल्हापूर जिल्हा “Access to Justice” च्या कार्यक्रम समन्वयक रविना माने, संदीप सोनुले यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये “बाल विवाह मुक्त भारत” अभियानाचा शुभारंभ उत्साहात झाला.
या अभियानाच्या माध्यमातून सर्वच स्तरावर बालकांचे हक्क सुरक्षित होतील व त्यासाठी सदैव प्रयत्न करू आणि बालविवाह मुक्त जिल्हा करू असे विधी सेवा केंद्रचे प्रमुख इंगळे साहेब यांनी सांगितले.



0 Comments