Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

गोंदियात शिवशाही बस उलटून 12 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

गोंदिया / गीता संघर्ष वृत्तसेवा :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 23 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा गावात गोंदिया कुमार राज्य महामार्गावरील नाल्याजवळ घडली. घटनास्थळावर नागरिक आणि पोलीस पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे.

या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले असून त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली ही अर्पण करीत असल्याचे म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

देवेंद्र फडणवीसांनीही या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून मृतांचा कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी या घटनेतील जखमी लोकांना तातडीने उपचार द्या, असे निर्देश गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत.  आतापर्यंत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 जखमी असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली होती.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...