दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गट व अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे. इतर खाती व पालकमंत्री याबाबत राज्यामध्ये बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता. सागर बंगल्यावर महायुतीची ही महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे गावाला जाणार असल्यामुळे ही बैठक तातडीने रद्द करण्यात आली. त्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला आणखी विलंब होत आहे.
महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळवून देखील सरकार स्थापन केलेले नाही. मात्र महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. तर त्यांची जितेंद्र आव्हाडांनी भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2019मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला प्रकार पुन्हा होणार का याची चर्चा सध्या सुरु आहे. एकनाथ शिंदे यांची आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली आहे. त्याचबरोबर प्रहार नेते बच्चू कडू यांनी देखील भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटाच्या नेत्याशी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड म्हणाले की, राजकीय टिप्पणी आणि वैयक्तिक टिप्पणी ही वेगळी असते. शिंदेंसोबत आमची वैयक्तिक भांडण नाही. आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत. या विचारधारेसाठी आम्ही नेहमी लढत राहू. महायुतीचे सरकार अद्याप बनले नाही याचे मला काहीही नाही. मी त्यांना मला सरकारमध्ये घ्या असं सांगायला गेलो नाही. आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आमच्यामध्ये राहू द्या, असे सूचक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.



0 Comments