जयसिंगपूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
जयसिंगपूर येथील पायोस हॉस्पिटलच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारुन ३८ वर्षीय युवक मयतही घटना आज, सोमवार, 14 तारखेला घडली14 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हार्दिक प्रकाश रुपानी वय वर्ष 38 रा.गल्ली नं.6 यड्रावकर ऑफीस शेजारी जयसिंगपुर असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येचे नोंद झाली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतुन मिळालेली माहिती अशी की जयसिंगपूर पायोस हॉस्पिटलमध्ये मृत युवकांचे वडील यांच्या पायावर उपचार सुरू आहेत. दरम्यान रविवारी रात्री मृत हार्दिक हा वडील यांच्या जवळ थांबला होता. मात्र आज सोमवारी पहाटे अचानक हार्दिकने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेचे माहीती हॉस्पिटल तर्फे जयसिंगपूर पोलीस ठाण्यास देण्यात आली. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबतची वर्दी विदीत कनक वेद वय वर्ष 38 रा. गणपती पेठ सांगली याने जयसिंगपूर पोलिसात दिली असल्याची माहिती आज सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता जयसिंगपूर पोलिसातून मिळाली आहे. हार्दिक रूपानी याने उडी का? मारली यांचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास सहाय्यक फौजदार गुरखे व पो हे कॉ कांबळे या करीत आहेत




0 Comments