Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

उमेदवार, राजकीय पक्ष, मुद्रणालय चालक, प्रकाशक यांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले हे आवाहन

 कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा। 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके इ. मुद्रणांच्या संनियंत्रणासाठी जिल्ह्यातील सर्व मुद्रणालये यांचे लक्ष लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-A च्या आवश्यकतांकडे वेधण्यात येत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालक यांनी या सूचनांची नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले आहे.

 

कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणा-या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करु नये.यानुसार दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणा-या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवायचे आहे. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचे लायसन्स रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल.

 

      या ठिकाणी निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रितपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तीफलक असा होतो. जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असु शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...