राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दुरुस्ती व तेरवाड बसस्थानकाजवळ गतिरोधक बसविण्याची शिवसेना शहरप्रमुख रमेश वडर यांची मागणी.
कुरुंदवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा।
कर्नाटकातील बोरगाव ते महाराष्ट्रातील शिरोळ ते मिरज हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
तसेच शिरोळ ते दर्शन हाँटेल पर्यंतचा सिमेंट क्रांकीट रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. तसेच शिरोळ व पंचगंगा पुलावरील मोठे खड्डे पडले आहेत.
त्याच बरोबर कुरूंदवाड येथील शिवतीर्थ चौक येथे रस्ता खचला आहे आणि कुरूंदवाड ते तेरवाड रस्ता खराब झाला आहे.
तो तात्काळ दुरुस्त करावा व तेरवाड हे गाव महामार्गावरील वळणावरचे गाव आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठी वाहने भरधाव वेगाने धावत असतात. त्यामुळे बऱ्याच अपघाताना आतापर्यंत नागरिकांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी तेरवाड बसस्थानकाजवळ व आणखी चार ठिकाणी गतिरोधक बसविण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तेरवाडचे शहरप्रमुख रमेश वडर यांच्या हस्ते मिरजेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल खोत सर, प्रशांत हातळगे, उमेश शेडबाळे, स्वप्नील बिर्जे आदी उपस्थित होते.






0 Comments