सांगली/ गीता संघर्ष वृत्तसेवा :
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्याकडून मतदारसंघाचा कल जाणून घेत आहेत. आज शरद पवार सांगलीत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी दिलखुलास संवाद साधला.
माजी खासदार संभाजी राजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राज्यात नवीन आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीचा राज्यातील महाविकास आघाडीला अधिक फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. या आघाडीने विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी या आघाडीवर खोचक आणि मिश्किल टिप्पणी केली आहे.
माजी मंत्री शरद पवार हे आज सांगलीत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यात नवीन आघाडी तयार झाली आहे. त्याचा तुम्हाला फटका बसणार आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केव्हाही हे लोक एकत्र आल्यावर परिणाम होणारच. संभाजीराजे हे महान घराण्यातील लोकं आहेत. त्यामुळे नक्कीच परिणाम होईल. आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता काय आपलं होणार?, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे



0 Comments