पुणे / गीता संघर्ष वृत्तसेवा :
बदलापूरमध्ये शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार… त्याचीच काही दिवसांपूर्वी पुण्यात पुनरावृत्ती… 45 वर्षांच्या स्कूल बस ड्रायव्हरने चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला. या घटनेमुळ निर्माण झालेला संताप अद्याप शमलेला नसतानाच आता पुण्यात सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पुण्यातील बोपदेव घाटात गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही
बोपदेव घाटामध्ये सातत्याने लूटमारीच्या घटना घडत असतात. मात्र आता तेथे एका तरूणीवरती तिघांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला तिच्या मित्राने तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
रम्यान या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे भडकल्या असून त्यांनी संतापून ट्विट केलं आहे. ‘ पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. त्यावरून वातावरण तापलेले असतानाच काल पुण्यात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आला. वानवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
वानवडी पोलीस स्थानकात अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम आरोपी सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यावर गेल्या चार दिवसांपासून बसध्ये अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
सदर आरोपी एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडतो. दोन्ही पीडित मुली या त्याच्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या. गेल्या चार दिवसांपासून तो ड्रायव्हर दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचं नाही, अशी धमकीही त्या नराधमाने मुलींना दिली होती.



0 Comments