अकिवाट / गीता संघर्ष वृत्तसेवा :
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणार आहे. संपूर्ण राज्यभर हा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकिवाट येथील श्री विद्यासागर हायस्कूल येथे विद्यार्थ्यानी पारंपारिक वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहाने हा शाही दसरा महोत्सव साजरा केला.
या कार्यक्रमासाठी जवाहर साखर कारखान्याचे संचालक व शालेय समितीचे सदस्य संजय कोथळी व उपसरपंच आप्पासाहेब म्हैशाळे, शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दादासो वाडकर यांनी केले.



0 Comments