शिंगणापूरची ग्रामसभा गत 28 ऑगस्ट रोजी झाली. या ग्रामसभेत गावातील नव्या मुस्लिम मतदारांच्या नावाचा मतदार यादीत समावेश न करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. या ठरावाची एक प्रत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हा परिषद पातळीवरील चौकशीचे आदेश गटविकास आधिकारी व करवीर तालुक्याच्या तहसीलदारांना देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी य प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या कठोर भूमिकेनंतर शिंगणापूरच्या सरपंचांनी सारवासारव करत हे पत्र दिशाभूल करणारे असल्याचे नमूद करत ते बांगलादेशी अल्पसंख्यकांविरोधातील प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ग्रामसेवकांनीही हा वादग्रस्त ठराव अंतिम नसल्याचे स्पष्ट केले. पण या प्रकाराची गावासह जिल्ह्यात मोठी चर्चा झाली. तसेच असा प्रस्ताव पारित करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
खाली वाचा शिंगणापूर ग्रामसभेचा प्रस्ताव जशास तसा
विषय क्र. 2 अल्पसंख्याक (मुस्लिम) मतदान नोंदणी बाबत.
'मौजे शिंगणापूर गावच्या गावसभेत वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व शिंगणापूर गावच्या हद्दीतील नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणाऱ्या अल्पसंख्याक (मुस्लीम) यांची नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करणेत येवू नयेत असे सर्वानुमते ठरले.
तसेच ज्या ज्या वेळी नवीन मतदार यादी प्रसिद्ध होईल तेव्हा नवीन अल्पसंख्याक यांची नावे नोंद झालेचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायत मार्फत हरकती घेवून सदरची नावे कमी करणेत यावीत असे ही सर्वानुमते ठरले. त्यास आजची गावसभा सर्वानुमते मंजुरी देत आहे.'



0 Comments