जयसिंगपूर / गीता संघर्ष वृत्तसेवा :
चिपरी येथील अष्टपैलू ओंकार रावसाहेब पाटील हे शांती सदभावना सायकल यात्रेतुन काश्मिर ते कन्याकुमारी हे चार हजार किलोमीटर अंतर बावीस दिवसांत दररोज एकशे ऐशी किलोमीटर हे अंतर सायकल वरून पुर्ण करणेसाठी त्यांचे सहकारी बांधवासोबत रवाना झाले आहेत आज पर्यंत ओंकार पाटील हे आजपर्यंत सायकल वरून केलेला प्रवास धर्मनगर ईचलकरंजी फाटा ते सम्मेद शिखरजी झारखंड 2250 किमी तसेच उदगांव कुजंवन ते नाशिक मांगितुगी 700 कि मी तसेच ट्रेकिंग 10गड किल्ले आतापर्यंत सर केले तसेच 10000 कि मी हे अंतर सायकल वरून पुर्ण झाले आहे तसेच दररोज रंनिग 10 कि मी पाच वेळा पुर्ण केले असून ओंकार पाटील यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वच स्तरावर कौतुकांचा वर्षाव होत असुन काश्मिर ते कन्याकुमारी साठी रवाना होत असताना चिपरी मधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ओंकार यांची सायकलची आवड हि अगदि लहान पणापासून असलेची माहिती व त्यांना प्रोत्साहन दिले ते त्यांचे वडिल रावसाहेब पाटील आई राजश्री पाटील बंधु रोहण पाटील सानिका पाटील यांचे सहकार्या मुळे त्यांना घरचे बळ मिळाले ची माहिती ओंकार पाटील यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिली चिपरी गावच्या हिरा याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.



0 Comments