टाकळी / गीता संघर्ष वृत्तसेवा :
सैनिक टाकळी येथील विजय गणेशोत्सव मंडळ यांच्या गणपतीच्या विसर्जना निमित्त भव्य रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पंचकोशीतील सर्व वारकरी मंडळी हजारोंच्या संख्येने हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान गावातील भजनी मंडळे मोठ्या उत्साहात हरी नामाचा जप करत ज्ञानेश्वर माऊली या नावाने आवगी सैनिक टाकळी दुमदुमून गेली. गावातील सर्वच मंडळांनी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. ज्ञानेश्वर माऊलींच्या रिंगण सोहळ्याच्या अश्वांचे उभ्या रिंगण तसेच गोल रिंगण अगदी सुंदर रित्या पार पडले. अगदी सैनिक टाकळीतील माता भगिनींनी वृद्ध वारकरी मंडळींनी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा संपन्न झाला.



0 Comments