खिद्रापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।
खिद्रापूर येथून जवळच असेल अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजापूरवाडी या गावचे काही नागरिक खिद्रापूर गावची शोभा वाढवत असल्याचे चित्र सध्या खिद्रापूर येथे दिसून येत आहे. खिद्रापूर हे एक पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. येथील कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येतात. पण राजापूरवाडी येथील काही मद्यपी नागरिक कोपेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर पार्किंग क्षेत्रामध्ये मद्यधुंद अवस्थेत पडलेले असतात. आरडाओरडा करीत येथील शांतता भंग करत असतात.
याबाबत पोलीस प्रशासन ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील यांनी अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. याबाबत कोणती ठोस पावले पोलीस प्रशासन, पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांच्याकडून उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


0 Comments