शिरोळ /गीता संघर्ष वृत्तसेवा।
शिरोळ येथील बेघर वसाहतमध्ये राहणाऱ्या व गांजाची नशा केलेल्या एका तरुणाने गुरुवारी रात्री शहरात हैदोस घातला. शिरोळ पोलीस ठाण्याच्या गाडीवर दगडफेक करून काच फोडली.
त्याचबरोबर शहरातील सात जणांना दगडाने मारून जखमी केले. तसेच दोन मोटरसायकली आणि एक मोटार कारवर दगडफेक केली. या घटनेनंतर शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बल्लू बेडगे या तरुणांने गांजाची नशा करून शहरात नंगानाच सुरू केला. पोलिसांना खबर मिळताच, त्यांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु, बेडगे याने पोलिसांच्या गाडीवरच दगडफेक करून काच फोडली. पोलिसांनी त्यास कसाबसा पकडून ठाण्यात आणले.
परंतु, गांजाच्या नशेत असलेल्या तरुणाने पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली.



0 Comments