Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

मोटर सायकल चोरट्यांना अटक - स्थानिक गुन्हे अन्वेषणची कार्यवाही

 कोल्हापूर /गीता संघर्ष वृत्तसेवा। 


करवीर तालुक्यातील  दिंडनेर्ली फाटा येथे चोरीतील मोटारसायकली विक्री साठी आलेल्या ऋषीकेश उर्फ गणेश उमेश पाटील (वय 24.रा राधानगरी) आणि अक्षय चंद्रकांत पाटील (वय 29.रा.शिरगाव ,ता.राधानगरी) या दोघां चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्यावर असलेले पाच गुन्हे उघडकीस आणुन एक लाख तीस हजार रुपये किमंतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात एक,इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दोन ,शाहुवाडी पोलिस ठाण्यात एक आणि पंढ़रपूर शहर पोलिस ठाण्यात एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले.

अधिक माहिती अशी की,कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकीच्या होत असलेल्या चोरीच्या घटना ही चिंताजनक बाब असून त्याचा वेळीच तपास करून गुन्हें उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास दिल्या होत्या.या अनुशंगाने तपास करीत असताना करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली फाटा येथे  चोरीतील मोटारसायकल विकण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात बुधवार(दि.04) रोजी सापळा रचून ऋषीकेश आणि अक्षय यांना ताब्यात घेऊन विना नंबरची मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी ही मोटारसायकल चोरीची असल्याचे सांगून राधानगरी येथील सुहास नामदेव चव्हाण यांच्या मदतीने चोरी करीत असल्याची कबुली दिली.या चोरट्यांवर गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली असता त्यांच्याकडे अधिक चौकशी करुन पाच गुन्हे उघडकीस आणले.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...