Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

नवभारत शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी दामोदर सुतार यांची फेरनिवड

शिरोळ/ गीता संघर्ष वृत्तसेवा। 


     सांगली येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी हेरवाड (ता. शिरोळ) येथील दामोदर सुतार गुरुजी यांची फेरनिवड करण्यात आली. खासदार विशाल दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

       नवभारत शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शांतिनिकेतन लोक विद्यापीठातील स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम माळी रेड कॉर्पेट सभागृहात झाली. यावेळी वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी विशाल दादा पाटील होते.  

      दामोदर सुतार यांनी अनेक सहकारी, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रदीर्घ काळापासून काम केले आहे. प्राथमिक शिक्षक बँकेचे 22 वर्षे माजी चेअरमन, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त भांडारचे विद्यमान चेअरमन तसेच विविध संस्थांमध्ये अनेक पदावर संचालक, मार्गदर्शक म्हणून सध्या काम पाहतात. नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची फेरनिवड होऊन त्यांचा सत्कार यावेळी खासदार विशाल दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

     सभेचे प्रास्ताविक संचालक गौतम पाटील यांनी केले. स्वागत उपसंचालक डी. एस. माने यांनी केले तर आभार दामोदर सुतार यांनी मानले. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील, सनतकुमार आरवाडे, एडवोकेट सतीश पाटील, विनया घोरपडे, नितीन कोळेकर, बी. आर. थोरात यांच्यासह सर्व विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...