शिवार न्यूजचे संपादक व दैनिक जागृत लोकनेताचे उपसंपादक संतोष तारळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीने कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हॉलमध्ये हा शानदार कार्यक्रम पार पडला.
पत्रकार संतोष तारळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना आपल्या लेखनीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. पत्रकार ते उपसंपादक, संपादक पदापर्यंत पोहचून समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी आजही अविरतपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, या पुरस्काराचे वितरण आज रविवारी कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हॉलमध्ये करण्यात आले.
यावेळी पुणे न्यूज एक्सप्रेसचे प्रमुख मेहबूब सर्जेखान, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद माधव कुलकर्णी, ज्येष्ठ संपादक सागर बोराडे, फिरोज मुल्ला, धोंडीराम शिंदे, दीपक ढवळे, संतोष जंगम, अब्दुल कय्युम रशिद, प्रमोदिनी माने, मुरलीधर कांबळे, श्रीकांत कांबळे यांच्यासह शिवसेना शाखाप्रमुख विशाल जाधव, दत्तात्रय तारळे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सौदे यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते



0 Comments