शिरोळ/गीता संघर्ष वृत्तसेवा।
सहकाराच्या माध्यमातून दत्त कारखान्याने चौफेर विकास साधला आहे. त्यामुळे राजकारणापुर ते राजकारण करून सहकाराचे मंदिर समजल्या जाणाऱ्या दत्त कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गणपतराव पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा युवा मोर्चाचे मा. अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी दिली.
दत्त कारखान्याने सभासदांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. क्षारपड मुक्त योजना, ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी विविध उपक्रम, शेतकऱ्यांच्या बांधावर खते पोहोच करणे, शेतकऱ्यांच्या मुलांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण संस्था शेतकऱ्यांना वैद्यकीय आधुनिक उपचार मिळण्यासाठी दवाखान्याची सोय यासह विविध उपक्रमात दत कारखाना अग्रस्थानी आहे. त्यामुळे सहकारामध्ये राजकारण आणणे हेच उद्दिष्ट मनाशी बाळगून तालुक्यासह इतर तालुक्यातील नेत्यांनी दत्त कारखाना निवडणुकीत एकमुखी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान शिरोळ तालुक्यातील पृथ्वीराज यादव यांनी दत्त कारखान्याच्या कार्याचा आढावा घेऊन गणपतराव पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिल्याने सदरची निवडणूक एकतर्फे होणार असल्याची चर्चा सुरू आहे.



0 Comments