याबाबत घटनास्थळावरून व पंढरपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लहू बेविनकट्टी हे सोमवार तारीख ८ जुलै रोजी कारदगा येथील दिंडीतून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघाले होते. वाटेत भजन ,कीर्तन करीत अत्यंत धार्मिक वातावरणाने पंढरपूरला जाऊन काल बुधवारी १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतले. व आज सकाळी दर्शन घेऊन बोरगांव कडे परतीच्या वाटेवर असताना पंढरपुरातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अत्यंत गरीब कुटुंबातून जन्मलेले लहू हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.बोरगाव इचलकरंजी येथे रंगकाम करीत आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. त्यांना नेहमीच भजन कीर्तनाची आवड असायची . नेहमी पंढरपूर वारी करीत होते. आषाढी एकादशी निमित्त यावर्षीही पंढरपूर वारीला गेले होते .मात्र बोरगावकडे येत असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना शहरात समजतात अत्यंत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटना पंढरपूर पोलीस स्थानकात नोंद झाली असून पंढरपूर रुग्णालयात शवाविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले .लहू यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.



0 Comments